नाशिक : शहरातील मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या हरिविहार सोसायटी मधील बंद गाळ्यामध्ये आढळले 8 मानवी कान, डोळे आणि मेंदू. सोसायटीचे 20 आणि 21 क्रमांकाचे दोन गाळे आहेत. ते 15 वर्षांपासून बंद आहेत. अचानक दुर्गंधी येत असल्याने सोसायटीतील नागरिकांनी दुर्गंधी कोठून येते हे पाहण्याचा प्रयत्न करत असताना एका गळ्याचा कुजलेला पत्रा बाजूला करून पाहिले असता त्या गाळ्यातून दुर्गंधी येत असल्याचे समजले.
त्यानंतर 112 नंबर वरून पोलिसांना माहिती दिली असता पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल आनंदा वाघ सुनील रोहकले यासोबत न्यायसाहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेची टीम (फॉरेन्सिक ) तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी शटर उघडून आत मध्ये पाहिले असता तिथे भंगार पडलेलं आढळून आले. त्यामध्ये लाकडी टेबल, खुर्च्या लोखंनी सामान तसेच प्लास्टिकचे डब्बे देखील आढळून आले.
पोलिसांनी प्लास्टिकचे डब्बे उघडताच भयानक असा दुर्गंध पसरला.तोंडाला मास्क लावून पोलिसांनी पाहाणी केली असता त्यात 8 मानवी कान, डोळे आणि मेंदू आढळून आले. पुढील तपासणी साठी फॉरेन्सिक पोलिसांच्या ताब्यात सर्व अवयव दिले आहेत. या गाळ्यांची मालकीण असलेल्या शुभांगी शिंदे आणि त्यांच्या दोन डॉक्टर मुलांना चौकशी साठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिंदे यांचा एक मुलगा डेंटिस्ट आहे तर दुसरा कान नाक घसा तज्ञ आहे. डॉक्टर असलेल्या या मुलांनी वैद्यकीय अभ्यासाठी हे अवयव ठेवले असावेत असा पोलिसांना अंदाज होता.
परंतु याबाबतची कुठलीच माहिती या शिंदे कुटुंबाकडून दिली जात नसल्याने त्यांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले आहे. आढळून आलेले मानवी अवयव हे वैद्यकशास्त्रीय पद्धतीने द्रव्यात ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे याचा संशय दोन डॉक्टर भावावर असल्याने रात्री उशीरा पर्यंत चौकशी करण्यात येत होती. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon