रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्शवभूमीवर अमेरिकेची युक्रेनला 1 बिलियन डॉलर्सची आर्थिक मदत, मात्र सैन्य पाठवण्यास नकार
युक्रेन : रशियाने युक्रेनवर बॉम्ब हल्ले केल्याने तिसऱ्या महा युद्धाला सुरुवात झाली असल्याचे दिसत आहे. रशिया युक्रेन युद्धच्या पार्शवभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनला सर्वत्तोपारी मदत करण्याचे जाहीर केले आहे. त्याच पार्शवभूमीवर अमेरिकेने उक्रेनला 1 बिलियन डॉलर्सची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे मात्र, अमेरिकन सैन्य युक्रेन मध्ये पाठवण्यास जो बायडन यांनी नकार दिला आहे.रशियाने गुरुवारी युद्धाची घोषणा केल्या नंतर लगेचच युक्रेनवर हवाई हल्ला करून युद्धाला सुरुवात केली.युक्रेनची राजधानी किव्ह या शहरावर रशियाने मिसाईल हल्ले करण्यात आल्याने युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे.खारकिव्ह मध्ये रशिया हल्ला केल्याने 8 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी किव्ह मधील टीव्ही टॉवर वर रशियाने हल्ला केल्याने मोठं नुकसान झालं असून सर्व तांत्रिक सेवा मध्ये बिघाड झाला आहे.
रशियाने केलेल्या हमल्याचा युक्रेन नागरिक मोठ्या धैर्याने युक्रेन सैन्यासोबत खंबीरपणे उभे राहून रशियाचा मुकाबला करत आहेत.युक्रेन मधील महिला नागरिक पेट्रोल बॉम्ब रशिया टँकर वर फेकत असून रशियन सैन्याल रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आपल्या देशाच्या प्रति असलेल्या प्रेमाखातर युक्रेन चे नागरिक सुद्धा रशिया विरुद्ध लढा देत आहेत.
रशिया युक्रेन युद्धाचा भारतावरही होणार परिणाम
युद्धाचा परिणाम जगावर होत असतो. तसाच भारतावर ही आर्थिक बाबतीत परिणाम होणार आहे.पेट्रोल-डिझेल, गॅस आणि पॉलिडीयमच्या किंमती मध्ये भरमसाठ वाढ होणार असल्याने त्याचा फटका भारताला बसणार आहे. दरम्यान युद्ध थांबविण्यासाठी रशिया युक्रेन यांच्यातील कालची बैठक निष्फळ झाली असून आज पुन्हा युद्धावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशाची चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon