धम्म टेकडी धमधम येथे विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात धम्म टेकडी धमधम येथे विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न 

जिंतूर :
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात धम्म टेकडी 
धमधम येथे रविवार 27 फेब्रुवारी रोजी 6 वी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली.जिंतूर शहरापासून 40 किमी अंतर असलेल्या धम्म टेकडी धमधम या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद  आयोजित केली जाते. कोरोना कालखंडात धम्म परिषद घेता आली नव्हती. कोरोना कालखंड संपल्यानंतर पुन्हा ही विशाल बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली आहे.
विशाल बौद्ध धम्म परिषदेचे सचिव व मुख्य आयोजक सुभाष वाव्हळे आणि ऍड. कपिल खिल्लारे हे मागील दीड महिन्यापासून धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत होते.धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जिंतूर तालुक्यातील खेड्यापाड्यात व्हावा या प्रांजल हेतूने या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे.
चार सत्रामध्ये ही धम्म परिषद संपन्न झाली.पहिल्या सत्रात पूज्य भन्ते प्रज्ञाशील यांची धम्म देसना झाली. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात धम्म चळवळीतील विविध मान्यवरांनी धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी तसेच धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मार्गदर्शन केलं
या दरम्यान धम्म परिषदेला उपस्थितांना भोजन व्यवस्था करण्यात आली होती.
धम्म परिषदेत डॉ. यशवंत खडसे लिखित आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. यशवंत खडसे, समाज रत्न ऍड. कुमार घनसावध, ऍड. कपिल खिल्लारे, सुभाष वाव्हळे, बीआरएसपीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे, मनिष वाव्हळे, प्रा. विठ्ठल कांगणे, बोधचार्य शिवाजी लाटे, राजु निकाळजे, अजीम भाई, सय्यद नुसरत, विकास वाव्हळ आदी मान्यवर उपस्थित होते.
धम्म परिषदेच्या 4 थ्या आणि शेवटच्या सत्रात बुद्ध भीम गीतांचा स्वरा दीदी तामघाडगे नागपूरकर यांचा प्रबोधनपर कार्यक्रम झाला.या विशाल बौद्ध धम्म परिषदेला जिंतूर तालुक्यातील खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने उपासकांची उपस्थिती होती.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng