Pune crime: भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शस्त्र विरोधी पथकाची मोठी कार्यवाही ; 4 पिस्टल व 4 जिवंत राऊंड सह आरोपीला अटक

शस्त्र विरोधी पथकाने 4 पिस्टल व 4 जिवंत राउंड हस्तगत करत आरोपीला केलं जेरबंद 
पुणे : एम आय डी सी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि.27 जुलै 2022 रोजी पो कॉ प्रविण मुळूक यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की इंद्रायणी नगर भोसरी येथे एक इसम पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या नेतृवाखी पो.उपनिरीक्षक बी.आर गोसावी,पो हवा गवारी,पो कॉ मुळूक,पो कॉ शेळके यांनी सापळा लावला.

कार्यवाही दरम्यान आरोपी वेदांत विशाल माने वय 25 वर्ष रा. साईधाम हॉस्पिटल मागे लांडेवादी भोसरी यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक गावठी पिस्टल व त्याच्या जवळील बॅग मध्ये 3 गावठी पिस्टल व 4 जिवंत राउंड आढळून आले. त्याच्याकडे एकूण 102100 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळाल्याने त्याला ताब्यात घेऊन एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास भोसरी ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

वरील कार्यवाही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे,श्री काकासाहेब डोळे पो उपायुक्त गुन्हे,सहा. पो उपायुक्त प्रशांत अमृतकर,सहा.पो उपायुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, पो.उपनिरीक्षक बी आर गोसावी, सहा. फौजदार शिंदे, सहा. फौजदार लखनकुमार वाव्हळे, पो हवा. गवारी,पो.हवा. प्रीतम वाघ, पो. हवा शेख,पो कॉ प्रविण मुळूक,पो कॉ मोसीन आत्तार, पो कॉ शेळके व पो.हवा.माळी सायबर गुन्हे शाखा यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.
Previous
Next Post »