अमरावती जिल्ह्यात दलितांना 28 दिवसापासून पाण्यासाठी धरलं वेठीस ; दलित कुटुंबानी सोडलं गाव

अमरावती जिल्ह्यातील सावंगी मग्रापूर येथील दुर्दैवी घटना, 28 दिवसापासून दलित कुटुंबाचा पाणी पुरवठा बंद, दलितांनी सोडलं गाव 
अमरावती : जिल्ह्यातील सावंगी मग्रापूर येथील वार्ड क्रमांक 1 मधील दलित कुटुंबाना मागील 28 दिवसापासून ग्रामपंचायतने पाणी पुरवठा केला नाही. त्यामुळे या वार्डातील लोकांना पाण्याविना तडफडावे लागत असल्याची दुर्दैवी बाब पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहे. गावातील उपसरपंच यांनी जातीयद्वेष्यातून त्रास देण्याच्या उद्देशाने वॉर्ड नंबर 1 मधील पाणी पुरवठा मागील 28 दिवसापासून बंद केला आहे.1 नंबर वॉर्ड हा संपूर्ण दलित वस्तीचा भाग आहे.

28 दिवसापासून पाणी मिळाले नसल्यामुळे पाण्यावाचून तडफडत राहण्याची वेळ या दलित कुटुंबावर आली आहे . त्यामुळे एक नंबर वॉर्डातील सर्व दलित कुटुंबाने गाव सोडलं असून गावा बाहेरील एका विहिरीजवळ ठिय्या दिला आहे.आजही दलित मागासवर्गीयावरील अन्याय अत्याचार वेगवेगळ्या मार्गाने चालूच अहेत.खरोखरच ही घटना पुरोगामी महाराष्टाला काळिमा फासणारी आहे . शासन या बाबत काय कार्यवाही करणार, पीडित दलित मागासवर्गीय समाजाला न्याय मिळणार का? दोषींवर कार्यवाही होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng