मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात ; 4 जनांचा अपघात मृत्यू

मुंबई -पुणे एक्सप्रेस वेवर 7 वाहनांचा भीषण अपघात, कार मधील 4 जन जागीच ठार.
मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी ट्रेलर मुळे 7 वाहनांचा विचित्र असा भीषण अपघात झाला आहे. या  अपघातात 4 जनांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर 3 जन गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईकडे जाणाऱ्या लेन वर एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने 7 वाहनांचा एकमेकांवर धडकल्याने विचित्र असा अपघात झाला आहे. या दरम्यान ट्रक आणि टेम्पो च्या मध्ये कार आल्यामुळे कारचा चुराडा झाल्याने कार मधील चार जन जागीच ठार झाले आहेत.सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला असून आणखी 3 जन गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात स्थळी धाव घेत महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स आणि देवदूत यंत्रणा यांनी मदत कार्य तात्काळ सुरु करून अडकलेल्या जखमींना रुग्णालयात पाठवून दिले असून अपघातग्रस्त आणि फसलेले वाहने बाहेर काढून वाहतूक पुन्हा सुरळीत करून दिली आहे.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng