भाजपा आमदार नितेश राणे न्यायाल्यासमोर शरण येणार, तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करणार असल्याची ईच्छा केली व्यक्त
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संतोष परब हल्ला प्रकरणी कणकवली न्यायालयाने आमदार नितेश राणे यांचा नियमित जमीन अर्ज फेटाळल्याने आमदार नितेश राणे आता न्यायाल्यासमोर शरण येणार असल्याची माहिती स्वतःनितेश राणे यांनी माध्यमांना दिली आहे.सर्वोच्च न्यायालयाने अटके पासून दिलेलं संरक्षण आणखी पाच दिवस असताना देखील उच्च न्यायालयातील जमीन अर्ज मागे घेतला आहे. या प्रकरणी तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करणार असल्याचे राणे यांनी सांगितले आहे.उच्च न्यायालयातील जमीन अर्ज देखील त्यांनी मागे घेतला आहे. तसा अर्ज न्यायालयात केला होता त्याला न्यायालयाने मान्यता दिली आणि जमीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज मागे घेतला असल्याचे नितेश राणे यांचे वकील माणेशिंदे यांनी माहिती दिली आहे. नितेश राणे हे न्यायालयाला शरण येत असून तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र राज्य सरकार वेगवेगळ्या मार्गाने अटकवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील नितेश राणे यांनी केला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon