10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकारणी 70 वर्षीय वृद्धास न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
मुंबई : मुंबईतील अग्रीपाडा भागात एका 70 वर्षीय वृद्धाने 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली.या प्रकरणी 70 वर्षीय वृद्धाला अग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे.शुक्रवारी संध्याकाळी मुलीने झालेल्या प्रकारबद्दल कुटुंबियांना सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचे अग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी ही माहिती दिली आहे.पीडित तरुणी आणि आरोपी हे एकाच परिसरात राहतात. आरोपी हा मुलीला आपल्या घरी बोलवून चॉकलेट्स आणि बिस्कीट द्यायचा.बिस्कीट आणि चॉकलेट्स चे आमिष दाखवून मुलीला नको त्या ठिकाणी स्पर्श करायचा.अशातच शुक्रवारी संध्याकाळी पीडित मुलगी घाबरलेल्या व मानसिक तणावात असल्याचे कुटुंबियांना दिसले. त्यानंतर कुटुंबियांनी मुलीची विचारपूस केली असता मुलीने घडला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर ताबडतोब कुटुंबियांनी अग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दिली.
या प्रकरणी 70 वर्षीय वृद्धाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यवक्त केला जात आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon