आता सातबारा उतारा होणार बंद, त्याऐवजी मिळणार प्रॉपर्टी कार्ड ; राज्य शासनाचा नविन निर्णय

शहरातील सातबारा उतारा होणार बंद, आता मिळणार प्रॉपर्टी कार्ड,  राज्य सरकारचा निर्णय 
मुंबई :  आता शेतकऱ्यांना सातबारा उतारा मिळणे होणार बंद. सातबारा उतारा ऐवजीअ आता शेतकऱ्यांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड. वाढत्या शहरीकरणामुळे शहरी भागात शेतीजमीन उरली नसल्याने राज्य सरकारने नविन निर्णय घेतला असून या निर्णयामुळे आता सातबारा उताऱ्या ऐवजी प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे. राज्यातील ज्या ज्या शहराचे सिटीसर्वे झालेले आहेत आणि सातबारा उतारे देखील सुरु आहेत. अशा शहरातील सातबारा उतारा बंद करण्याचा आणि त्याबद्दल्यात प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.

शहरी भागात सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड दोन्ही चालू असल्यामुळे त्यात फसवणूक केली जात असे. मात्र आता प्रॉपर्टी कार्डमुळे खरीदी विक्रीच्या व्यवहारात फसवणूक होणार नसल्याने हा निर्णय घेतला असून आता शहरी भागात फक्त प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. याची सुरुवात पुण्यातील हवेली तालुक्यासह सांगली, मिरज आणि नाशिक शहरापासून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर प्रॉपर्टी कार्डचा निर्णय लागू करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी चांगल्या रीतीने झाल्यास राज्यात सर्वत्र का निर्णय लागू करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.

शहरात सिटीसर्वे झाला आहे पण सातबारा उतारा नाही अशा ठिकाणी घोळ होऊन फसवणूक होते आणि त्यामुळे न्यायालयीन प्रकरणात वाढ होते. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी जिथे सिटीसर्वे झाला आहे आहे अशा शहरात सातबारा उतारा बंद करून प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng