कन्नड सहकारी साखर कारखाना कामगारांच्या थकीत वेतन प्रश्नावर महाराष्ट्र सहकारी बँकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा बैठकीत झाला निर्धार
कन्नड : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात कन्नड सहकारी साखर कारखान्यातील 967 कामगारांच्या थकीत वेतन प्रश्नावर आंदोलनात्मक भूमिका घेण्यासाठी दि.20 फेब्रुवारी रविवार रोजी कन्नड येथे बीआरएसपी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे आणि पँथर सेना प्रमुख सतीश पट्टेकर यांच्या उपस्थितीत कामगार बैठक संपन्न झाली. बैठकीत कामगारांच्या थकीत वेतन प्रश्नावर सखोल चर्चेदरम्यान महाराष्ट्र सहकारी बँकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा केला निर्धार.कन्नड सहकारी साखर कारखान्यातील 967 कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन मागील बारा- तेरा वर्षापासून देण्यात आले नाही. या कामगारांवर उपासमारीची वेळ आली. या कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळवून देण्यासाठी मागील एक वर्षांपासून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे आणि पँथर सेनेचे प्रमुख सतीश पट्टेकर हे शासन दरबारी लढा देत आहेत.
अनेक वेळा मोर्चे आणि आंदोलन देखील करण्यात आले. अनेक वेळा जिल्हाधिकारी, सहकारी बँकेचे अधिकारी, कारखान्याचे अधिकारी, सहकार आयुक्त आणि सहकार मंत्री यांच्या सोबत बैठका झाल्या आहेत. या बाबतीत खुद बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. डॉ सुरेश माने, बीआरएसपी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे आणि कामगार प्रतिनिधी यांची मुंबई येथे सहकार मंत्री यांच्या सोबत बैठक होऊन सकारात्मक चर्चा देखील झाली होती.
मात्र अद्याप कामगारांच्या थकीत वेतन प्रश्नावर कुठलाच ठोस निर्णय सरकारच्या वतीने घेण्यात आला नाही. त्यामुळे कामगारांना थकीत वेतन मिळवून देण्यासाठी बी आर एस पी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे आणि पँथर सेना प्रमुख सतीश पट्टेकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सहकारी बँकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. लवकरच या धरणे आंदोलनाची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे अरविंद कांबळे यांनी सांगितले आहे.
या बैठकीला सतीश पट्टेकर (पँथर सेना प्रमुख ), अरविंद कांबळे (जिल्हाध्यक्ष -बीआरएसपी ), शेख अजीम भाई वणीकर (जिल्हा उपाध्यक्ष बीआरएसपी),सय्यद नुसरत (जिल्हा सचिव बीआरएसपी),शेख मोसीन भाई (शहर अध्यक्ष अल्पसंख्यांक बीआरएसपी),विश्वजित बागुल (कन्नड तालुका अध्यक्ष बीआरएसपी),साहेबराव गायकवाड (कामगार तालुका अध्यक्ष बीआरएसपी), वाल्मिकी साळवे (उपसरपंच बीआरएसपी),संजय धनेधर (तालुका महासचिव बीआरएसपी),विजय लोखंडे (तालुका सचिव बीआरएसपी ) आदी पदाधिकारी व कामगार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
ConversionConversion EmoticonEmoticon