नांदेडमध्ये भीषण अपघात ; नववधू सह 6 जनाचा मृत्यू

नववधूला मांडव परतनीला घेऊन जात असलेल्या टाटा मॅजिक वाहनाला टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नवरी सह 6 जनांचा मृत्यू 
भोकर : नांदेड जिल्ह्यातील भोकर-हिमायत नगर रोड वर नव वधूला घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिक आणि टेम्पो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण  अपघातात नववधू सह 6 जनांचा अपघात स्थळीच मृत्यू झाला आहे. सोमवारी 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास भोकर- हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे.हा अपघात एवढा भीषण होता की मृत्यूची संख्या वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

या भीषण अपघातात अनेक जन गंभीर जखमी झाले असून त्यांना भोकर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटने ची माहिती मिळताच पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 2 दिवसापूर्वी विवाह सोहळा पार पाडून मांडव परतनीला नववधूला  पाठवण्यात येत होते. नववधू सोबत तिचा भाऊ व इतर काही जन टाटा मॅजिकने जात असताना सोमठाणा शिवारात चटलावर यांच्या ढाब्या समोर विट वाहतूक करणाऱ्या टेम्पोला समोरासमोर धडक झाली.टेम्पो हिमायत नगर कडून नांदेड कडे जात होता तर अपघात ग्रस्त टाटा मॅजिक धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथून नववधू सह तिचा भाऊ व इतर नातेवाईक यांना घेऊन उमरखेडला जाण्यास निघाले होते.

या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे 
मृता मध्ये पूजा ज्ञानेश्वर पामलवार (21रा. साखरा नववधू ),दत्ता ज्ञानेश्वर पामलवार (22 नवरीचा भाऊ ),माधव पुरभाजी सोपेवाड (30 रा. जांबगाव. ता उमरी ),सुनील दिगंबर धोटे -चालक (28 रा. चालगणी. ता. उमरखेड )यासह अन्य दोन व्यक्तींचा मृता मध्ये समावेश आहे.
अपघातात जखमी 
नागेश साहेबराव कन्नेवार (28 रा. जारीकोट ),अविनाश संतोष वंकलवाड( रा.तामसा ),सुनीता अविनाश तोपलवार (35 रा तामसा ),अभिनंदन मधुकर कसबे (16 रा. वाजेगाव )या सह इतर कही जन जखमी झाले आहेत.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng