तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांनी महाराष्ट्रात येऊन भाजपा विरोधात आघाडी बनविण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केली चर्चा, सर्व मुद्यावर झाले एकमत, उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्याचे दिलं निमंत्रण
मुंबई : आज 20 फेब्रुवारी रोजी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटी दरम्यान राष्ट्रीय पातळीवर भाजपा विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली असून आघाडी संदर्भात अनेक मुद्यावर एकमत झाले असल्याचे के सी आर यांनी सांगितले आहे. भाजपा विरोधात एकत्र येण्यास अनेक लोक तयार आहेत. त्यांना सोबत घेऊन भाजपा विरोधात सक्षम पर्याय उभा करायचा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार असून अनेक राज्यात जाऊन चाचपणी केली जाणार असल्याचे राव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.'महाराष्ट्रातून निघणारा मोर्चा चांगला यशस्वी होतो' असं केसीआर यांनी म्हटलं आहे. शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि मराठा योद्धा यामुळे देशाला प्रेरणा मिळाली आहे आणि त्याच मार्गाने जाण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे मत राव यांनी यावेळी व्यक्त केलं. आम्हाला अन्यायाविरोधात आणि अनैतिक गोष्टी विरोधात लढायचं आहे. आज आमच्या दोघात जी चर्चा झाली त्याचा येणाऱ्या काळात खूप चांगला आणि सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल.
"मी तेलंगणाची जनता व माझ्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हैद्राबादला येण्याचे आमंत्रण देतआहे".आज आम्हाला महाराष्ट्राकडून खूप प्रेम मिळालं आहे. हे प्रेम आम्ही सोबत घेऊन जात आहोत तसेच या प्रेमाची परत फेड करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं के चंद्रशेखर राव यांना म्हटलं आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देशाचे राजकारण, देशाच्या विकासाची गती आणि स्थिती यावर चर्चा करण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो असल्याचे चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांना भेटून खूप आनंद झाला आहे. आमच्यात चांगली चर्चा झाली आहे.चर्चेदरम्यान अनेक गोष्टीवत एकमत झाले आहे.येणाऱ्या काळात देशाच्या विकासाठी,देशात चांगल्या सुधारणा आणि विकासाची गती वाढविण्यासाठी तसेच धोरण बदलण्यासंबंधी चर्चा झाली असून त्यावर आमचे एकमत झालं असून आमची एकजूट आहे.
येणाऱ्या काळात एकत्र काम करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. देशात अनेक समविचारी लोक आहेत त्यांच्यासोबत माझं बोलणं सुरु होतं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील बोलणं सुरु होतं.लवकरच हैदराबाद किंवा दुसऱ्या ठिकाणी आम्ही सर्व लोक एकत्र भेटून चर्चा करू आणि एक मार्ग ठरवू असं देखील चंद्रशेखर राव यांनी यावेळी सांगिले.
ConversionConversion EmoticonEmoticon