AIMIM : एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदोद्दीन ओवेसी यांची हत्या करण्याचा कट रचल्याची आरोपीने दिली कबुली

खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची अटक केलेल्या आरोपनी दिली कबुली

नवी दिल्ली : (AIMIM ) एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवेसी यांच्यावर गुरुवारी गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यातून खासदार ओवेसी बाल बाल बचावले आहेत. उत्तर प्रदेश  विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. प्रचार सभा करून ओवेसी दिल्लीला परत येत असताना पश्चिम उत्तर प्रदेशमधील हापूरजवळील टोल नाक्यावर दोघांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या परंतु असदोद्दीन ओवेसी खाली वाकल्यामुळे त्यांना गोळी लागली नाही. सुदैवाने ते सुखरूप आहेत.
  फोटो : अमर उजाला (हल्ल्यातील आरोपी सचीन आणि सुभम )

गोळीबार करणारे दोन्ही हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. हल्ल्यातील अटक केलेल्या आरोपिंची  सचिन व सुभम अशी नावे असून त्यांनी हल्ल्याची कबुली दिली आहे. ओवेसी यांना जिवे मारण्यासाठी कट रचन्यात आला होता. त्यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. त्यानुसार हापूरजवळील टोल नाक्यावर ओवेसी यांना जिवे मारण्यासाठीच त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला असल्याची कबुली यातील मुख्य आरोपी सचिन याने दिली आहे. ओवेसी यांच्या भाषणाचा राग मनात धरून आरोपीने हा हल्ला केल्याचे सांगितले आहे.

खासदार असलेल्या व्यक्तीवर जातीयद्वेष भावनेतून जिवे मारण्याचा प्रयत्न ही भारतीय लोकशाहीसाठी अतिशय गंभीर घातक बाब आहे. निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या नेत्याने केलेलं भाषण आवडले नाही म्हणून त्याच्यावर गोळ्या घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा खून करणे होय. असं कोणी पण करेल एखादा पक्ष अवडला नाही किंवा त्याची विचार धारा आवडत नसेल तर त्या नेत्याला ठार करणे ही कुठली संस्कृती आहे. अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढले पाहिजे अन्यथा अशा घटना कोणत्याही पक्षाच्या नेत्याबाबतीत घडू शकतात.

खासदार ओवेसी यांच्या हात्येचा कट करून हल्ला करणाऱ्या आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. परंतु उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या हल्ल्याप्रकरणी कोणती भूमिका घेणार , हल्लेखोरावर कठोर कार्यवाही करणार का? हे पाहावे लागेल. परंतु जातीय द्वेष भावनेतून एखाद्या लोक प्रतिनिधीवर गोळ्या झाडून जिवेमारण्याचा कट रचणे खरोखरचं लोकशाहीला घातक आहे.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng