भुवनेश्वर : ऑडिशाच्या भुवनेश्वर येथे एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात उत्पन्नापेक्षा 500 पट संपत्तीचं घबाड सापडलं आहे. लाचलूचपत विभागाच्यावतीने या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या घरी छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात करोडो रुपयाची बेशोबी मालमत्ता सापडली आहे. छापेमारी दरम्यान एक बीएमडब्लू कार आणि स्पोट्सबाईक सह 11 कोटींची बेहिशोबी संपत्ती जप्त केल्याचे लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जप्त केलेली मालमत्ता
भ्रष्ट पोलीस अधिकारी त्रीनाथ मिश्रा यांच्या घरून जप्त केलेल्या संपत्ती मध्ये 1 कोटीची बीएमडब्लू एक्स- 7 कार, 17 लाख किंमतीची ह्युंदाई क्रेटा कार,मारुती बलेनो, शेवरोलेट ट्रेलब्लेझर एलटीझेड कार, 5.3. लाख रुपयांची जी टी आर 250 हायसंग बाईक तसेच इतरही अनेक वस्तू जप्त केल्या आहेत.
बेकायदेशीर अनेक ठिकाणी भूखंड केले खरीदी
पोलीस अधिकारी त्रीनाथ मिश्रा याने पत्नी आणि मुलाच्या नावाने अनेक भूखंड खरीदी केले असून ते बेकायदेशीर असल्याचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत. पोलीस अधीक्षक अक्षय कुमार मिश्रा यांनी सांगितले की बुधवारी त्रीनाथ मिश्रा यांच्या घरी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याकडून छापे मारी मारण्यात आली होती.
बेशोबी मालमत्ता जमवल्या प्रकरणी भ्रष्ट पोलीस अधिकारी त्रीनाथ मिश्रा यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.ऑडिशच्या लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक कार्यवाहीला सुरुवात केली असून मागील दीड महिन्यात 23 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असल्याचे एस पी अक्षय कुमार मिश्रा यांनी सांगितले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon