नांदेड मध्ये घडली दुर्दैवी घटना पत्नी आणि सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून प्राध्यापकाने गळफास घेऊन केली आत्महत्या
नांदेड : शहरातील भाग्य नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्राध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.पत्नी आणि सासरच्या मंडळी कडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका प्राध्यापकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या(suicide case)केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या प्राध्यापकानी भावनिक सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोट मध्ये त्यांनी आपल्या मुलाला उद्देश म्हटलं आहे की पत्नी आणि तिच्या सासरच्या मंडळीच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे.या घटनेतील मृत प्राध्यापकाचे नाव संदीपान खंदारे असून ते उमरखेड तालुक्यातील ब्राह्मण गाव येथील तेजमल गांधी कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.संदीपान खंदारे यांचा 2019 मध्ये उमरखेड तालुक्यातील कृष्णपूर गावातील स्नेहल गायकवाड यांच्याशी विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर संदीपान यांचे सासू आणि सासरे यांच्याशी वादीवाद होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अनेक वेळा सासू सासऱ्यांनी मारहाण देखील केली. पत्नी व सासराच्या मंडळीकडून सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेवटी संदीपान खंदारे यांनी 15 फेब्रुवारी रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.घटनेची माहिती मिळताच भाग्य नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना रजिस्टर मध्ये सुसाईड नोट सापडली.
सुसाईड नोट मध्ये संदीपान यांनी त्यांच्या मुलाला उद्देशून लिहिलं आहे की 'प्रिय वेदांत' तूझ्या आई ने आणि तिच्या नातेवाईकांनी तुझ्या पप्पाला तुझ्यापासून हिरावलं आहे.माझ्या मृत्यूस तुझ्या आईसह पाच जन जबाबदार आहेत त्यांना तू सोडू नकोस. या सुसाईड नोट मध्ये आत्महत्येस जबाबदार असलेल्या व्यक्तींचे नाव नमूद असल्याने संदीपान यांची बहीण रंजना यादव यांच्या तक्रारीवरून भाग्य नगर पोलिसांनी मृत संदीपान यांची पत्नी स्नेहल गायकवाड, सासू गोदावरी गायकवाड,सासरा आनंद गायकवाड यांच्यासह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास भाग्य नगर पोलीस करत आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon