महाराष्ट्रात पत्रकार परिषदांचे फुटले पेव ; मात्र राज्यातील जनतेच्या हिताचे कोणीच बोलत नाही

राज्यात पत्रकार परिषदांची राजकीय दंगल, विकासाच्या मुद्यावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी पत्रकार परिषदांची स्पर्धा 
मुंबई : सध्या राज्यात राजकीय नेत्यांच्या पत्रकार परिषदांचे पेव फुटले आहेत. मात्र राज्यातील जनतेच्या हिताचे कोणीच बोलत नाहीत.सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते एकमेकांच्या विरोधात भ्रष्टाचारांचे आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राज्यात जशी काय आरोप प्रत्यरोपांची स्पर्धाच लावली की काय असं वातावरण तयार झालं आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने करत आहेत.

 भ्रष्टाचारबाबत ते पोलिसात आणि ईडी कडे लेखी तक्रारी पण करत आहेत.नेत्यांच्या भ्रष्टाचाराबाबत  ते नेहमी पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असतात. परंतु आता किरीट सोमय्या यांच्या आरोपाला प्रतिउत्तर देण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यानी देखील पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. लगेच आज भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत हे  राज्यातील आणि देशातील सर्व जनतेने बघितलं आहे.

तरुणांमध्ये साततत्याने वाढत चाललेल्या बेरोजगाराच्या प्रश्नावर तसेच महागाईच्या मुद्यावर कोणीच बोलत नाही.विकासाच्या मुद्यावर कोणी बोलत नाही. पत्रकार परिषदा घेण्याच्या चाललेल्या स्पर्धेमुळे राज्यातील जनतेच्या पदरात काय पडले आहे. राज्यातील जनतेची केवळ दिशाभूल केली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्यसरकार विकासाच्या मुद्यावर रोजगाराच्या मुद्यावर गप्प आहे. राजकीय दंगल करून विकासच्या मुद्यावरून राज्यातील जनतेचं लक्ष हटवण्याचं षडयंत्र सत्ताधारी आणि विरोधकांकडून केलं जात आहे.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng