ठाणे जिल्ह्यातील 56 विद्यार्थी उक्रेन मध्ये अडकले असल्याची माहिती, पालकांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील विविध शहरातील 56 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले आहेत.याबाबत ची माहिती ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली.ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाद्वारे शुक्रवारी पालकांसाठी हेल्पलाईन नंबरची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे आता पर्यंत ठाणे जिल्ह्यातील 56 पालकांनी संपर्क करून आमची मुलं युक्रेन मध्ये अडकल्याची माहिती दिली आहे.सध्या रशिया आणि युक्रेन यांच्या युद्ध सुरु झाले आहे.वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारतातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात युक्रेनला जातात.तसेच ठाणे जिल्ह्यातील आतापर्यंत 56 विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले असल्याची माहिती ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थान कक्षाला मिळाली असल्याची माहिती दिली आहे.जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले असल्याची माहिती तात्काळ राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगिले आहे.
रशिया आणि युक्रेन या दोन देशात भारतातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेलं आहेत. सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशात युद्ध सुरु झाले असल्याने ठाण्यातील विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने पालकांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा-भाईंदर,कल्याण - डोंबिवली,मुरबाड,बोरिवली,अंबरनाथ,पडघा,नेरुळ,वाशिंद, भिवंडी,कामोठे,घणसोली आणि नवी मुंबई उल्हासनगर तसेच ऐरोली या भागातील 56 वैद्यकीय विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना मायदेशी लवकरात लवकर परत आणण्याची विनंती पालकांनी भारत सरकार कडे केली आहे.
युक्रेन मध्ये अडककेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संपर्क साधावा
युक्रेन मध्ये अडकलेल्या ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी पालकांसाठी ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.022-25301740/25381886 या क्रमांकावर आणि thaneddmo@gmail.com या ई-मेल आयडी वर संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon