अहमदाबाद विशेष न्यायालयाने 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटतील 38 दोषींना सुनावली फाशीची शिक्षा
अहमदाबाद : गुजरात मधील अहमदाबाद येथे 2008 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी तब्ब्ल 14 14 वर्षांनी अहमदाबाद च्या विशेष न्यायालयाने निकाल दिला असून विशेष म्हणजे या प्रकरणातील 38 दोषींना एकाच वेळी फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर इतर 11 दोषींना अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा सुनावली असून इतर 28 आरोपिंची निर्दोष मुक्तता केली आहे. या साखळी बॉम्बस्फोट दुर्धटनेत 56 जनांचा मृत्यू तर 200 जन जखमी झाले होते.या प्रकरणातील 49 दोषींना अहमदाबाद विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए.आर पटेल यांनी शिक्षा सुनावली आहे. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबाद मध्ये एका पाटोपाठ एक असे अवघ्या 70 मिनिटात 21 भीषण स्वरूपाचे बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणातील सरकारी वकील अरविंद पटेल यांनी सांगितले आहे की, 38 दोषींना भा.द.वि.कलम 302 (हत्या करणे )आणि 120 ब (गुन्हेगारी स्वरूपाने हात्येचा कट रचणे ) या अनुसार व बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए ) अनुसार तसेच इतर 11 दोषींना (यूएपीए )कायद्याच्या विविध कलमांच्या तरतुदी प्रमाणे शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणातील दोषींना 2.85लाख तर इतर एकाला 2.88 लाख दंड देखील ठोठावण्यात आला आहे. या बॉम्बस्फोटात मृत्यू मुखी पडलेल्यांच्या नातेवाईकाला 1 लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये तर किरकोळ जखमींना 25 हजार रुतो नुकसान भरपाई देण्याचे आदेश अहमदाबाद विशेष न्यायालयाने दिले आहेत.शिक्षा सुनावलेल्या दोषीमध्ये सफदर नागोरी, कयुमुद्दीन कापडिया,झाहीद शेख,शमशुद्दीन शेख आदींचा समावेश आहे.मात्र भारतीय न्यायालयाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे जिथे एकाच निकालात 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon