परभणी : वसमत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे खड्डा चुकविताना रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात मायलेकराचा मृत्यू. वसमत रस्त्यावरील रहाटी परिसरात अनेक महिन्यापासून रस्त्याचे काम संथ गतीने चालू आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडलेले अहेत. या रस्त्यावरील खड्डा चुकविताना रिक्षा पलटी झाल्याने रिक्षातील महिला पद्मिनी शिंदे (32) व तिचे 8 वर्षाचे मूल बाहेर पडले. रिक्षातून बाहेर पडल्याने जब्बर मार लागल्यामुळे मायलेकराचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील शिंदे कुटुंब त्रिधारा येथे देवदर्शनासाठी येत होते. दरम्यान रहाटी परिसरात खड्डा चुकवताना रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात पद्मिनी शिंदे व त्यांचा 8 वर्षाचा मुलगा यांचा या अपघात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, पद्मिनी शिंदे यांचे पती मुंजाजी शिंदे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताने मायलेकराचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघाताला ठेकेदार जबाबदार असल्याने ठेकेदारावर कार्यवाही करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. या रस्त्यावर असे अनेक अपघात झाल्याचे परिसरातील लोक सांगतात. त्यामुळे आता तरी या संथ गतीने चालू असलेल्या रस्त्याच्याकामाकडे लोक प्रतिनिधी आणि ठेकेदार लक्ष देणार का? असा प्रश्न नागरिक विचारत अहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon