प्रकाश आंबेडकरांचे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला निवडून आणण्याचे आवाहन ; प्रकाश आंबेडकरांची ही भूमिका कितपत योग्य? आंबेडकरी समाजात चर्चेला उधाण

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला निवडून देण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन कितपत योग्य? आंबेडकरी समाजात उलट सुलट चर्चेला उधाण 
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला निवडून देण्याचं काल आवाहन केलं. 2024 ला केंद्रात भाजपाचे सरकार येऊन घटना बदलेल असा अंदाज प्रकाश आंबेडकर यांनी बांधला आहे. उत्तर प्रदेशात आंबेडकरवादी पक्ष म्हणून बहुजन समाज पक्ष असताना सपाला निवडून द्या असं सांगणे प्रकाश आंबेडकरांच्या कोणत्या तत्वात बसते. जर उत्तर प्रदेशात बसपाचे सरकार आले तर संविधान बदलन्यायासाठी बसपा भाजपाला मदत करणार आहे का? कोणत्या आधारावर प्रकाश आंबेडकर यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकरांची ही भूमिका आंबेडकरी समाजाच्या विचाराच्या पलीकडे आहे.

प्रकाश आंबेडकर यांची ही भूमिका आंबेडकरवादी अजिबात वाटत नाही. मुळात वंचित बहुजन आघाडीची राजकीय ताकत उत्तर प्रदेशात किती आहे असा जर आपण विचार केला तर काडीची ही ताकत  नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून एवढीच ओळख तिथे आहे. परंतु आपल्याशिवाय दुसरं कोणी आंबेडकरवादी नाही आणि या समाजाचे आपणच तारणहार आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर करत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय राजकारणात कुठलेच स्थान नाही परंतु केवळ बहुजन समाज पक्षाला विरोध म्हणून समाजवादी पक्षाला निवडून देण्यास सांगतात.

प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेचा महाराष्ट्र आणि देशातील आंबेडकरी समाज नक्कीच विचार करणार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेचा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि भक्त सोयीस्कर अर्थ लावून त्यांच्या नेत्याची भूमिका कशी योग्य आहे हे पटवून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. परंतु समाज या गोष्टीचा नक्कीच विचार करणार आहे. काल पर्यंत बाळासाहेब आंबेडकर यांना मानसन्मान होता परंतु या भूमिकेमुळे नक्कीच संशय निर्माण झाला आहे. बाळासाहेब आंबेडकर हेच समाजाचे खरे नेते असल्याची टीमकी वाजवाणाऱ्यांनी याचे आत्मपरीक्षण करून कोण आंबेडकरवादी आहे हे स्पष्ट करावे.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng