मुंबई : ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात काल सोमवारी 31 जानेवारी रोजी विद्यार्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. त्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थांनी अशा प्रकारे आंदोलन करायला नको होते. राज्यातील विद्यार्थी हुशार अहेत त्यांनी आपले प्रश्न सरकारकडे मांडायला पाहिजे होते.असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून एवढ्या मोठ्याप्रमाणात आंदोलन करणे यामागे नक्कीच कोणाची तरी शक्ती आहे. त्याशिवाय एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाही. कोणी तरी जाणीवपूर्वक हे घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. याबाबतीत गृहविभागाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले अहेत. या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्ती किंवा संघटना बाबत कसून चौकशी केली जाईल.
या घटने मागे नेमकं कोण आहे याचा तपास करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री या वर योग्य तो तोडगा काढतील. त्यांना राज्यातील विद्यार्थ्यांची काळजी आहे. सरकार विद्यार्थना नक्कीच मदत करण्याची भूमिका घेईल.मात्र विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे असे देखील दिलीप वळसे पाटील यांनी मत व्यक्त केलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon