नवी दिल्ली : कोरोना मुळे 2020 च्या मार्च पासून देशात लॉकडाउन लागू केल्यामुळे सर्व रेलगाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पुर्व पदावर येत असताना काही विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. आता कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी होत असून सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले अहेत. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने 23 पॅसेंजर गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशासाठी आनंदाची बातमी आहे. मागील दोन वर्षांपासून बंद असलेली पॅसेंजर गाडी सुरु होत असल्याने तिकीट खिडकीतून सामान्य तिकीट मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आता सोपा होणार आहे.
23 पॅसेंजर गाड्या सुरु करण्याचा निर्णय प्रवाशांना दिलासा देणारा असला तरी केवळ राजकीय हेतू ठेऊन घेतलेला हा निर्णय आहे. 6 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या 23 गाड्या फक्त पंजाब राज्यात धावणार आहेत . पंजाब विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. एकट्या पंजाब साठीच 23 गाड्या सुरु करण्याचा निर्णय राजकीय हेतू साध्य करण्यासाठीच मोदी सरकारने घेतला आहे. देशातील इतर रेल्वे विभागात मात्र पॅसेंजर ट्रेन चालवण्याचा निर्णय झाला नाही. इतर ठिकाणी पॅसेंजर गाडीने लोक प्रवास करत नाहीत का? असा देखील प्रश्न निर्माण होतोय.
पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपाला फायदा व्हावा या हेतूने केंद्र सरकारने 23 पॅसेंजर गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे.कारण सर्वच्या सर्व म्हणजे 23 गाड्या फक्त पंजाब साठीच सुरु करण्यात आल्या आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon