ज्वेलर्स दुकान दाराकडून ठेविवर 18 टक्के व्याजासह परतावा करण्याचे आणि भिसी आणि फिक्स डिपॉजिट सारख्या योजनावर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून 26 गुंतवणूक दारांना 1 कोटी 56 लाख 74 हजार रुपयाला फसविल्याची तक्रारी दाखल
कल्याण : कल्याणमधील एका ज्वेलर्सने गुंतवणूक दारांना 18 टक्के जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून 26 गुंतवणूकदारांची तब्बल 1 कोटी 56 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.कल्याण शहरात असलेल्या एस.कुमार गोल्ड अँड डायमंड या सोने व्यापाऱ्याने 26 गुंतवणूक दारांची जादा व्याज दर देण्याच्या नावाखाली फसवणूक केली आहे. सध्या हे दुकान बंद असून एस कुमार गोल्ड अँड डायमंड या दुकानाचा व्यस्थापक फरार असून या प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एस कुमार गोल्ड अँड डायमंड हे दुकान कल्याण पश्चिम मध्ये वल्लीपीर रोडवर झोझवाला हाऊस मध्ये होते. परंतु हे दुकान अचानक बंद झाल्याचे पाहून यामध्ये गुंतवणूक करणारे पुरते घाबरून गेले आहेत.एस कुमार गोल्ड अँड डायमंड या दुकानाचे मालक, चालक संचालक यांनी 26 गुंतवणूकदरांची तब्ब्ल 1कोटी 56 लाख 74 हजार 539 रुपयांची फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले आहे.या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कल्याण मंगलगड रोड वर अमृता पार्क सोसायटी मध्ये राहणारे रोशल गावीत (33) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी वरून भा दं वि कलम 420,406 यासह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण कायद्याखालील कलम 3 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एस कुमार गोल्ड अँड डायमंड या शोरूमचे व्यवस्थापकी संचालक श्रीकुमार पिल्लई यानी गुंतवणूकदारांना मुदत ठेविवर 18 टक्के व्याज देण्याचे दाखवले.यासोबतच सोने योजनेच्या गुंतवणूकित माफक किंमतीत सोने व डायमंड देणार असल्याचे आणि त्यासाठी त्यांच्याकडे मासिक भिसी योजना, फिक्स डिपॉजिट योजना अशा विविध आकर्षक योजना चालू असल्याचे भासवून गुंतवणूक दाराकडून पैसे घेतले.गुंतवलेल्या रक्कमेवर 15 ते 18 टक्के व्याजासह परतावा मिळेल अशी जाहितात करण्यात आली होती.
मे एस.कुमार गोल्ड अँड डायमंडचे मालक श्रीकुमार पिल्लाई यानी सन 2018 ते 2021 या कालावधीत गोशल गावीत यांच्याकडून 2 लाख 40 हजार व त्यांची आई क्लाडेट परेरा यांच्याकडून 10 हजार रुपये गुंतवणूकिसाठी घेण्यात आले होते.मात्र त्याबद्दल्यात सोनेही दिले नाही आणि घेतलेले पैसे ही परत न देता फसवणूक केली आहे. तसेच इतर लोकांचे देखील पैसे घेऊन त्यांना सोने दिले नाही आणि पैसे परत न करता अचानक दुकान बंद करून फरार झाले.
या प्रकरणी गोशल गावीत आणि त्यांची आई क्लाडेट परेरा यांच्या सह इतर 25 जनांचे एकूण 1कोटी 56 लाख 74 हजार 539 रुपयांची फसवणूक झाली असल्याची तक्रार दाखल झाली असून यासंदर्भात सर्व कागद पत्र पुरावा म्हणून सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon