पक्षी अभयारण्यामध्ये वाळूचा अवैध उपसा ; म्हसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीत 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रात वाळूचा अवैध उपसा होत असताना नेवासा म्हसूल विभाग, वन्यजीव विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीत डम्पर सहित 13 लाखांचा मुद्देमाल जप्त 
पैठण : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रात सर्रास अवैध वाळू उपसा केला जात आहे.अहमदनगर मधील नेवासा तालुक्यात प्रवरासंगम नियत क्षेत्रात म्हाळापूर येथे 24 जानेवारी रोजी सायंकाळी अवैध वाळू उपसा होत असताना वन्य जीव विभाग, म्हसूल व पोलीस प्रशासनाने केलेल्या संयुक्त कार्यवाहीत 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कार्यवाहीत एक तराफा व एक डम्पर असा एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती औरंगाबाद जिल्हा वन्य जीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी डॉ.राजेंद्र नाळे यांनी दिली आहे. सदर कार्यवाही डॉ राजेंद्र नाळे व विभागीय वन अधिकारी अमित कुमार मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.या कार्यवाही मध्ये वनपाल बांगर,कन्नड, नागद तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल शेळके,सागर ढोले म्हसूल विभागाचे सुनील लावंडे तसेच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, वनपाल रुपाली सोळसे आणि संदीप मोरे आदींनीचा सहभाग होता.
Previous
Next Post »