वर्धा जिल्ह्यात झायलो गाडी पुलावरून कोसळली ; 7 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, आमदार पुत्राचाही मृत्यू

वर्धा जिल्ह्यात झायलो पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात 7 विद्यार्थांचा जागीच मृत्यू एका आमदार पुत्राचा ही समावेश 
वर्धा - देवळी मार्गावर झायलो गाडी पुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघातात 7 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू. मृतामधील 7 ही तरुण  सावंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी होते.सावंगी येथील 3 विद्यार्थ्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला असून यात एका आमदार पुत्राचा ही समावेश असल्याचे कळले आहे.रात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला आहे. सेलसुरा येथील पुलावरील दुभाजकाला धडक लागून चालकाचे नियंत्रण सुटल्याने झायलो गाडी पुलावरून 40 फूट खाली कोसळली त्यात 7 जनांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघात एवढा भीषण होता की गाडी आणि गाडीतील सर्व साहित्याचा चुराडा झाला आहे. विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रक चालकच्या निदर्शनास ही बाब लक्षात आल्याने वर्धा कडे जाता सावंगी पोलीस ठाण्यात अपघाता बाबत माहिती दिली. त्यानंतर ताबडतोब पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर रात्री उशीरा 7 ही  विद्यार्थ्यांचे मृतदेह सावंगी येथील रुग्णालयात आणले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी सांगितले आहे.मृत विद्यार्थ्यामध्ये तिरोड्याचे आमदार पुत्राचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. वरील 7 ही विद्यार्थी सावंगी येथील मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी होते.मृतामध्ये नीरज चौहान (एमबीबीएस अंतिम वर्ष )अविष्कार रहांगडले (एमबीबीएस प्रथम वर्ष ), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष ), नितेश सिंह (इंटर्न ),प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष ),शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष ) आणि पवन शक्ती (एमबीबीएस प्रथम वर्ष ) अशी अपघातात मृत विद्यार्थांची नावे असून यामध्ये तिरोडाचे आमदार विजय रहांगडले यांच्या मुलाचाही समावेश आहे.
Previous
Next Post »