अनाथांची आई सिंधूताई सकपाळ यांचं निधन ; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

अनाथांची 'माय' सिंधू ताई सकपाळ यांचं निधन, आज दुपारी 12 वाजता शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार 
पुणे : देश विदेशात अनाथांची 'मायी ' म्हणून ओळख असलेल्या समाज सेविका सिंधूताई सकपाळ यांचं पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे मंगळवारी संध्याकाळी वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं.निराधार आणि बेघर मुलांचा आधार, हजारो अनाथ मुलांचा असरा असणाऱ्या सिंधू ताई सकपाळ मागील महिना भरापासून उपचार घेत होत्या. त्यांचं काही दिवसापूर्वी हॉर्नियाचं देखील ऑपेरेशन झालं होतं.तेव्हा पासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.शेवटी हृदयवीकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं.
सिंधूताई यांच्या निधनाने हजारो निराधारांची मायेची सावली हरपली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.त्यांचा अंत्यसंस्कार आज दुपारी 12 वाजता शासकीय इतमामात करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. सिंधू ताईंच्या जीवन प्रवासाला अत्यंत खडतर पणाने सुरवात झाली.सिंधू ताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्यातील नरगाव येथे झाला. घरात मुलगी जन्माल्याने तिरस्काराच्या भावनेने आई वडिलांनी त्यांचं नाव चिंधी ठेवलं होतं. शिक्षण घेण्याची ईच्छा असून देखील कसे बसे चौथी पर्यंतचं शिक्षण घेता आलं.

वयाच्या नव्या वर्षी सिंधू ताईचं लग्न झालं होतं. त्यानंतर अत्यन्त बिकट परिस्थितीचा सामना करावा लागलेल्या सिंधू ताई सकपाळ हजारो अनाथांच्या आई झाल्या. अनेक संस्था उभारून अनाथ मुलांना मायेची लावली देत त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं. अनेकांची लग्नही करून दिलीत.सिंधूताई आईच झाल्या नाही,तर त्या अनेकांच्या आजी सुद्धा झाल्या अहेत. त्यांनी केलेल्या उलाखनीय करायची दखल घेत राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय पुरस्काराने त्यांचा सम्मान केला गेला आहे.भारत सरकारच्या वतीने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे.याशिवाय देश विदेशातील सातशे पेक्षा अधिक पुरस्काराने गौरविण्यात आलेलं आहे.

Previous
Next Post »