केरळ: नेत्याच्या हत्येप्रकरणात RSS चे दोन कार्यकर्ते अटक; CCTV फुटेजच्या आधारे केली कारवाई

     (केरळ मधील दुहेरी हत्याकांडाच्या पार्शवभूमीवर            राज्यात पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश )

राज्यभरात पुढील 3 दिवस सतर्कता वाढवण्याचे पोलिसांचे निर्देश; तपासाचा वेग वाढविण्यात आला 

केरळ : सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) चे राज्य सचिव के एस शान यांची शनिवारी रात्री अल्लापूझा येथे झालेल्या हत्येप्रकरणात केरळ पोलिसांनी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) दोन कार्यकर्त्यांना अटक केलीआहे . हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेले प्रसाद आणि रथिश हे दोघेही आर एस एस चे कार्यकर्ते असून ते पीडितेच्या गावचे आहेत.त्यांचा या हत्येच्या कटात सहभाग असल्याचे अलप्पुझाचे पोलीस अधीक्षक (एसपी) जी जयदेव यांनी सांगितले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीनी एसडीपीआय नेत्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांसाठी वाहनाची व्यवस्था केली होती. या प्रकरणी खून करणाऱ्यांसह इतर आठ जणांना अजून तरी अटक करण्यात आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .तसेच, शानच्या हत्येचा बदला म्हणून रविवारी सकाळी भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजित श्रीनिवास यांची हत्या करण्यात आली. या हात्येप्रकरणातील आरोपीना सुद्धा पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही

 रंजित श्रीनिवास यांच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये १२ जण सहा दुचाकींवर त्यांच्या गल्लीत शिरताना दिसत आहेत. रंजित हे राजकीय विरोधकांच्या हिटलीस्ट वर नसताना त्यांच्यावर झालेला हल्ला ही चिंतेची बाब आहे.असे,पोलिसांनी सांगितले आहे.अलाप्पुझा येथील दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे पोलीस प्रमुख अनिल कांत यांनी पुढील तीन दिवस राज्यभरात सतर्कता वाढवण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत. शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाईल आणि सार्वजनिक ठिकाणी अधिक पोलिस ठाणे उभारली जातील.खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात पुढील तीन दिवस मिरवणुका आणि लाऊडस्पीकर वापरण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे.

Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng