उत्तर प्रदेश : निवडणुका पुढे ढकला ; उच्च न्यायालयच्या प्रधानमंत्री मोदींना सूचना

उत्तर प्रदेश : विधानसभा निवडणूक लांबणार? अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या प्रधानमंत्री मोदींना सूचना 
कोरोना आणि ओमायक्रोन ची देशातील दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या आणि त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा निर्माण होणार संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारने वाराणसी मधल प्रधानमंत्री मोदी यांची रॅली रद्द करावी तसेच उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील विधानसभेच्या निवडणुकाही शक्य तो पुढे ढकलाव्यात अशा प्रकारच्या सूचना अलाहाबाद उच्च न्यायालयाने प्रधानमंत्री मोदींना दिल्या आहेत.
अलाहाबाद उच्च न्याललायचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या एकल खंड पीठसमोर एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान लोकांनी गर्दी केली होती. न्यायालयात जमलेली गर्दी पाहून त्यांनी प्रधानमंत्री मोदींनाही सूचना केल्या आहेत.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता वरील टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केलेली आहे.
राज्यात होणाऱ्या निवडणूकितील रॅली आणि प्रचार सभा रोखण्याकरिता प्रधानमंत्री मोदी आणि निवडणूक आयुक्तांनी याबाबतीत कठोर पावलं उचलावीत असं उच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्याच सोबत राजकीय पक्षांना टीव्ही आणि वृतमान पत्रांच्या माध्यमातून प्रचार करायला सांगावे असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. तसेच प्रधानमंत्री मोदींनीही निवडणुका पुढे ढकल्याबाबतीतला विचार करावा. कारण "जान हैं तो जहान हैं " असं देखील उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
Previous
Next Post »