पुणे : पेपर फुटीचा घोटाळा : टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये तुकाराम सुपे यांच्याकडे सापडलेल्या संपत्तीबाबत पत्रकारांनी विचारले प्रश्नावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अधिकाऱ्यांकडे जबाबदारी दिली तर ते भलतंच काही करतात. तुकाराम सुपे सारखे अधिकाऱ्याकडे कोट्यवधी रुपये सापडतात. आमच्या मुलामुलींच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कुणालाच नाही. या प्रकरणात शेवटर्यंत तपास करणार, कुणालाच सोडू नये, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. शनिवारी पुण्यात महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या प्रशिक्षण संस्थेच्या उदघाटनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केलं.
अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती सापडणे धोकादायक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे कुणाच्याही काळातील भ्रष्टाचार असेल तरी चौकशी होणार. आवश्यकता वाटेल तेव्हा तपास केंद्रीय चौकशी यंत्रणा सीबीआय कडे देऊ. तुकाराम सुपे प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असून त्याचे धागेदोरे कुठे गेलेत त्याचा तपास पोलीस योग्य करत आहेत. अशा घटना घडता कामा नये. यावर योग्य कारवाई केली जाईल असंही अजित पवार यांनी सांगितलं.
या प्रकरणाचा सीबीआयकडे तपास देण्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, सीबीआयला बाकीचं काम आहे. सध्याची तपास यंत्रणा योग्य काम करत आहे. तुम्ही पण पाहताय, सुशांत राजपूत प्रकरणात सीबीआयने काय केलं.आम्हाला वाटलं की आणखी कोणाला जबाबदारी दिली जावी तेव्हा सरकार विचार करेल. कुठल्याही सरकारच्या काळात घडले असले तरी कारवाई होणार असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या नियमावलीबद्दल अजित पवार म्हणाले की, रात्री 12 वाजता निर्णय झाला. आता आज कार्यक्रमात तेवढे नियम पाळले पाहिजेत. दिल्ली मुबंईत आंतराष्ट्रीय विमान जास्त येत आहेत. अनेकजण बाहेरून येतायत. काही बाबतीत मुरड घातली पाहिजे. नवीन वर्ष आहे त्यानिमित्त पार्ट्या असतात, तर नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon