पुणे : पुण्यातील एसीबीच्या पथकाने एका सहाय्यक फौजदारास लाच घेताना रंगेहात पकडले असून अटक केली आहे .न्यायालयाने काढलेले वारंट रद्द करण्यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यांनी एका व्यक्तीकडून दोन हजार रुपये लाच मागितली होती. याविरोधात त्या व्यक्तीने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली होती.प्राप्त तक्रारीवरून घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदारास अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव कोंडाजी दामोदर रेंगडे (वय 53)असं आहे. याप्रकरणी 34 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली होती.तक्रारदार असलेल्या व्यक्तीच्या विरोधात एक गुन्हा दाखल झालेला होता. त्याच्याविरोधात घोडेगाव न्यायालयात सुनावणी चालू आहे मात्र अनेक वेळा न्यायालयात हजर झाला नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात न्यायालयाने वारंट काढले होते.
तक्रारदाराच्या विरोधात निघालेले वारंट रद्द करण्यासाठी सहाय्यक फौजदार रेंगडे यांनी तक्रारदारास 5 हजार रुपये लाच मागितली होती.याबाबतची तक्रार अँटिक्रप्शन विभागात दिली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे सिद्ध झाले होते. त्यानुसार सापळा रचून दोन हजाराची तडजोड करून एसीबीने कोंडाजी रेंगडे या सहाय्यक फौजदारास रंगे हात पकडून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपाधीक्षक शितल घोगरे करीत आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon