रोहिणी खडसे यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला ; ड्राइवरच्या सतर्कतेमुळे सुखरूप

रोहिणी खडसे यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला, ड्राइवर च्या प्रसंगावधाणामुळे बाल बाल बचावल्या
जळगाव : रोहिणी खडसे या एका कार्यक्रमातून रात्री मुक्ताई नगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात 2 दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गाडीवर दगड फेक केली. दरम्यान गाडीच्या ड्राइव्हरने प्रसंगावधान दाखवून गाडी रस्त्याच्या बाजूला वळवून रोहिणी खडसे यांना घेऊन शेतात पळकाढला. त्यामुळे हल्ल्यातून त्या सुखरूप आहेत. अज्ञात हल्लेखोरांनी आधी गाडीवर दगड फेक केली आणि नंतर लोखंडी रॉडने गाडीवर हल्ला करून गाडीची नासधूस केली.
 रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या त्या कन्या असून जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा आहेत.त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मात्र जळगावात एकच खळबळ उडाली आहे.
रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की रोहिणी खडसे या त्यांचे स्वीय सहाय्यक सोबत मुक्ताई नगर कडे येत असताना दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञातांनी गाडीवर दगड फेक करून लोखंडी रॉड ने गाडीच्या काचा फोडून नासधूस केली आहे.या घटनेचा पुढील तपास चालू असल्याचे सांगितले आहे.

परंतु बोदवड नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप झाल्याचे पहायला मिळाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात बोलताना आपले राजकीय अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले होते आणि त्याच रात्री रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा रंगत असल्याचे दिसत आहे.परंतु रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो असं म्हणत या घटनेची उच्चस्तरी चौकशी झाली  पाहिजे असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng