रायगड जिल्ह्यात भरदुपारी महिला सरपंचाची हत्या ; झुडपात आढळला नग्न अवस्थेत मृत देह

रायगड जिल्ह्यात महिला सरपंचाची दिवसा ढवळ्या हत्या 
रायगड : रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील बोलोशी गावच्या महिला सरपंचाची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी हत्या करून महिला सरपंचाचा मृत देह नग्न अवस्थेत रस्त्याच्या बाजूला झुडपात फेकून देण्यात आल्याचे एका युवकास नजरेस आले. त्यानी जवळ जाऊन पहिले असता पोत्यात महिलेचा मृत देह नग्न अवस्थेत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
त्यानी घटना स्थळाजवळून जात असलेल्या गावातील लोकांना ही माहिती सांगितली. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या मृत देहाची पाहाणी केली असता ती महिला गावची सरपंच असल्याची ओळख पटली. त्यानंतर तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी महिला सरपंचास मृत घोषित केलं असून शव उत्तरी तपासणी साठी नेण्यात आलं आहे.

या हात्येप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला असून शव विच्छेदन अहवाल येण्याची वाट बघत आहेत. बलात्कार करून हत्या करण्यात आली की काय त्याबाबतील वैद्यकीय अहवाल आल्यानंतर अधिकचे कलम एफआरआय मध्ये लावण्यात येतील.तसेच महिलेशी संबंधित लोकांचे बयान देखील घेण्यात आले आहेत.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng