महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022: 900 जागासाठी अर्ज मागविण्यास सुरुवात
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ग्रुप 'क' संवर्गाच्या भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यामध्ये उद्योग निरीक्षक (गट क ), दुय्यम निरीक्षक (गट क ), तांत्रिक सहाय्यक (गट क ), कर सहाय्यक (गट क ), लिपिक-टंकलेखक (मराठी) या पदांसाठी नवीन भरती अधिसूचना जाहीर केली आहे. यासाठी , लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) या पदांसाठी एकूण 900 जागा रिक्त आहेत. पात्र व ईच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरून खात्री करून अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.अर्ज भरण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 आहे.खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अवेदन शुल्क 394 रु तर राखीव उमेदवारांसाठी 294रु अवेदन शुल्क आकारण्यात आले आहे.
भरती संदर्भातील तपशील खालील प्रमाणे आहे.
- विभागाचे नाव : महाराष्ट्र लोक सेवा आयोग
- पदांचे नाव : इंडस्ट्री इंस्पेक्टर (ग्रुप सी), सेकेंडरी इंस्पेक्टर (ग्रुप सी) टेक्निकल असिस्टेंट (ग्रुप सी), टैक्स असिस्टेंट (ग्रुप सी), क्लर्क-टाइपिस्ट (मराठी), क्लर्क-टाइपिस्ट (अंग्रेजी)
- पदांची संख्या : 900 रिक्त जागा
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- आधिकारिक वेबसाइट : www.mpsc.gov.in
- नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
- अर्ज करण्यास सुरवात : 22 दिसंबर 2021
- अंतिम तारीख : 11 जनवरी 2022
ConversionConversion EmoticonEmoticon