राज्य व देशातील काही निवडक बातम्यांचा आढावा

राज्य व देशातील काही ठळक बातम्यांचा आढावा 

मुंबई : कोरोनाच्या ओमायक्रोन विषाणूबाबतीत घाबरण्याचे शून्य टक्के देखील कारण नसल्याची प्रतिक्रिया आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.कल्याण-डोंबिवलीत ओमायक्रोनचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळल्याच्या पार्शवभूमीवर राजेश टोपे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : ओमायक्रोनने वाढवली महाराष्टाची चिंता ; कर्नाटक, गुजरात नंतर आता ओमायक्रोनने महाराष्ट्रात मारली धडक, कल्याण -डोंबिवलीत सापडला पहिला रुग्ण.

तामिळनाडू : तामिळनाडू सरकारचं भाषविषयी उफाळून आलं प्रेम. सरकारी नौकरी पाहिजे असल्यास तामिळ भाचेचा द्यावा लागेल पेपर. तामिळ भाषापेपर मध्ये पास न झाल्यास इतर पेपर तपासले जाणार नसल्याचे सरकारने काढलेल्या नव्या आदेशात म्हटलं आहे.

रायगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे हेलिकॉप्टर रायगडावर उतरविण्यास शिवप्रेमीनी विरोध केल्याने राष्ट्रपतीनी घेतला मोठा निर्णय.आता हेलिकॉप्टर ऐवजी रोपवेने रायगडावर जाणार असल्याची माहिती खा. उदयनराजे बोसले यांनी दिली.

मुंबई : परंबीर सिंग यांच्या विरोधात खंडणी प्रकरणी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी केले आरोप पत्र दखल. गोरेगाव खंडणी प्रकरणी परंबीर सिंग यांच्यावर आरोप पत्र दखल.

नाशिक : जागाच्या नकाशावर नाशिक ची ओळख कुंभ मेळ्याने झाली. साहित्यिकांच्या ज्ञानामुळे किमान भारताच्या आणि तंत्र ज्ञानामुळे जगाच्या नकाशावर दिसेल असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.

दिल्ली : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलं वादग्रस्त विधान. भाजपाने लूंगी वाले आणि जाळीदार टॉपिवाल्यांच्या दहशतीतून व्यापाऱ्यांना मुक्त केल्याचं म्हटले आहे.

बिहार : बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम ' गाण्याला एमआयएम पक्षाचा विरोध. बिहार विधानससभा हिवाळी अधिवेशनाची सांगता 'वंदे मातरम' गाण्याने करण्यास एम आय एम पक्षाच्या आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला असून आमच्यावर हे लादल्या जात असल्याची भावना व्यक्त केल्या.दरम्यान या मुद्यावरून भाजपा आमदार व एसआयएमचे आमदार समोरासमोर भिडले.


दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाची आज सिंधू बॉर्डर वर महत्वपूर्ण बैठक संपन्न.सरकारशी चर्चा करण्याकरिता संयुक्त किसान मोर्चाकडून 5 सदस्यांची समिती स्थापन.

लखनऊ : धक्का दायक! उत्तर प्रदेश मध्ये दोन दिवसापासून बेपत्ता मुलीचा मृत देह शेजाऱ्याच्या घरात सापडला. सहा वर्षाची मुलगी गुरुवारी बेपत्ता झाली होती दोन दिवसांनी शेजाऱ्याच्या घरात तिचा मृत देह सापडला. पश्चिम उत्तर प्रदेशाच्या हापूड जिल्ह्यात ही घटना घडली.
Previous
Next Post »