दिवसभरातील जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय काही ठळक घडामोडीचा आढावा
1)नाशिक :नाशिक येथे 94 वे अखिल भरतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्या पार्शवभूमीवर नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ असून गोदेच्या काठावर अधिक चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करीन अशा भावना संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक विश्वस पाटील यांनी व्यक्त केल्या.
2) रायगड :राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 6 डिसेंबर रोजी रायगड किल्ल्यावर येत आहेत.मात्र रायगड किल्ल्यावर हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्रेमीनी विरोध केला असल्याने जिल्हा प्रशासनाची मात्र धावपळ होत आहे.
3) पुणे :मालकाने कामाचे आगाऊ पैसे दिले नाही म्हणून दुकानालाच लावली आग. आगीमुळे आजूबाजूच्या दुकानाचेही झाले नुकसान.पिंपरीमधील दत्ता नगर -थेरगाव परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे
3) राज्यात अवकाळी पावसाचा पशुधनास फटका, राज्यात 'साडेतीन हजर' तर एकट्या पुणे जिल्ह्यात अडीच हजारापेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत. तर राज्यातील रायगड, नाशिक, पुणे, अहमदनगर व सातारा या जिल्ह्यातील 29 तालुके आणि 199 गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
4) मुंबई :शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा अटकपुर्व जामीन फेटाळण्यात आला.मनिलॉंड्रिंग प्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना उच्चन्यायालयाने अटक पुर्व जामीन नाकारला.मागील महिन्यात सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने अडसूळ यांचा जामीन फेटाळला होता.
5) मुंबई : ओमायक्रोनच्या भीतीने मुंबई विमानतळावर आतापर्यंत 800 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली.यापैकी कोरोना पॉसिटीव्ह आढळून आलेल्या 28 जनांचे नमुने जिनोमिक सिक्वेसिंगसाठी पाठवले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon