निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीची नोटीस ; संधी देऊनही कर्मचारी गैर हजर

संपात सहभागी असलेल्या निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्यासंबंधी मंडळाच्या अधिकाऱ्यात बैठक
मुंबई : संपात सहभागी असलेल्या निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्याच्या बाबतीत मंडळाच्या अधिकाऱ्यात बैठक झाली आहे. संपात सहभागी असलेले कायम स्वरूपी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना आपले म्हणणे मंडण्याची संधीही दिली होती. त्यातील काही जणांनी नोटीसीला उत्तर दिले परंतु बहुतांश कर्मचाऱ्यांनी अद्याप आपले म्हणे मांडले नाही.

कर्मचारी निलंबणाच्या नोटीसीला प्रतिसाद देत नाहीत.त्यामुळे महामंडळाने आता निलंबित कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावण्याबाबतीत परिवहन मंत्री अनिल परब व मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक होऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. सेवासामाप्तीच्या नोटीसी नंतर सुद्धा कर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे.कायमस्वरूपी सेवेत असलेल्या 2 हजर 83 कर्मचाऱ्यांना संपातील पहिल्या टप्प्यात निलंबित करण्यात आले होते.

परंतु कर्मचारी विलीनकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याने गुरुवारी 192 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे आतार्यन्त लिलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 9,384 वर गेली आहे. तर, रोजंदारीवर असलेल्या 65 जनांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.आता पर्यन्त एकूण 1 हजार 980 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.निलंबनाच्या कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्यात 11 नोव्हेंबर पर्यंत 2 हजार 53 कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. परंतु कर्मचारी निलंबणाच्या नोटीसीला दाद देत नसल्याने त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी पर्यायी मेस्मा या कायद्याचाही वापर करण्यासही राज्य सरकार मागेपुढे पाहणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
Previous
Next Post »