उत्तर प्रदेश : राष्ट्रीयलोकदल नेत्याच्या ताफ्यावर बुलंदशहरात तुफान गोळीबार ;50 पेक्षा अधिक गोळ्या झाडाल्याचा अंदाज, गोळीबारत 5 जन जखमी.
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेश मध्ये कार अपघातात 6 जनांचा झाला मृत्यू ; तेल गळतीमुळे कार ने घेतला पेट.
पुणे : पिंपरी -चिंचवड मध्ये आढळले ओमायक्रोनचे 6 रुग्ण ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केलं.
दिल्ली : लोक लेखा समित्यासाठी खुल्या मंचची आवश्यकता असल्याचे मत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी व्यक्त केलं. लोक लेखा समितीच्या दोन दिवशीय शताब्दी वर्ष समारोहच्या समारोपीय सत्रात ओम बिरला बोलत होते.
सोलापूर : राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघांचे 3 रे महाराष्ट्र राज्य स्तरीय अधिवेशन हुतात्मा स्मृती मंदीर सोलापूर येथे सुरु. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक वामन मेश्राम - राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ तथा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ दिल्ली.
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यात हृदय हेलावून टाकणारी
घटना घडली ;बहिणीने प्रेम विवाह केल्याने भावाने कोयत्याने वार करून बहिणीचा केला खून.
राजस्था : कोटा मध्ये धक्का दायक घटना घडली. एका महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून 5 मुलींसह विहिरीत उडी घेतली. या दुर्घटनेत सहाही जनांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
इस्रायल : इस्रायल सरकारने केलं गुप्त ऑपेरेशन ;शास्त्रज्ञाना अंधारात ठेवून न्यूक्लिअर प्लांट दिला उडवून
इंडोनिया : इंडोनिया भूकंपाने हदरला. भूकंपाचे आज 6 तीव्र झटके बसले. मात्र कुठलीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
ढोलपूर : राजस्थान मधील ढोलपूर मध्ये खाजगी शाळेतून काढून टाकल्याच्या कारणावरून एका अल्प वयीन विद्यार्थ्याने मुख्याध्यापकावर पिस्तूलाने चालवली गोळी.मुख्याध्यापक थोडक्यात बचावले असून मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
दिल्ली : भारतात आढळला ओमायक्रोनचा पाचवा रुग्ण. टांझानियावरून दिल्लीत परतलेला व्यक्तीचा अहवाल निघाला पॉसिटीव्ह
भारत : भारतात आतापर्यंत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 34633255 नोंदवली गेली असून 34,060,774 रुग्ण बरे झाले आहेत तर,4,73,326 रुग्णांचा आता पर्यन्त मृत्यू झाला आहे.
जळगाव : जळगावात 25 वर्षीय तरुणाचा खून.आदित्य चौक, रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या पवन मुकुंदा सोनवणे या तरुणावर रात्री 11 वाजता चाकू हल्ला झाला होता.आज त्याचा मृत्यू झाला
दिल्ली : भारतातील 50 टक्के नागरिकांचे लसीकरण आतापर्यंत पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मन्सूख मांडवीय यांनी दिली.
मुंबई : परंबीर सिंग यांना अटके पासून संरक्षण मिलते तर ऋषिकेश देशमुख यांना का मिळत नाही, वकील इंद्रपाल सिंग यांनी न्यायालयाला केला असा सवाल.
मुंबई : निलंबित पोलीस अधिकार सचिन वाझेनी परंबीर सिंग यांच्यासाठीच केली वसुली, मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी केला आरोप पत्रात दावा.गोरेगाव खंडणी प्रकरणी आरोप पत्र दखल.
ConversionConversion EmoticonEmoticon