(प्रतिनिधिक चित्र )
परभणी : परभणीतील वैद्यकीय महाविद्यालयाबाबतीत शासकीय पातळीवर सर्व प्रकिया पूर्ण झाली असून आगामी मंत्रिमंडळ बैठकीनंतर कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.5 डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना एका खासगी हॉस्पिटल च्या उदघाटन प्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.आरोग्य मंत्र्यांनी आश्वासन दिल्याने परभणीकरांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आरोग्यसंबंधिच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील आणि आरोग्य विभागाला सर्व सुविधा देखील पुरविल्या जातील. कोरोनाच्या नविन विषाणू ओमायक्रोन चा फारसा धोका नाही परंतु कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.तसेच पुढील सहा महिन्यात तालुका स्तरावरील आरोग्य केंद्रात सोनोग्राफी, सिटीस्कॅन आणि एमआरआय या उपकरणांची सुविधा करून दिली जाईल अशी माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली.या शिवाय जिल्ह्यात ईएसआयएसचे हॉस्पिटल आणण्याचा देखील प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना निसूल्क उपचार करता यावेत त्यासाठी राज्यपातळीवर योजनेची आखणी करत असल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी खा. सुरेश जाधव यांनी प्रास्तविक केलं. खासदार संजय जाधव व आमदार सुरेश वरपुडकर यांची भाषण झाली. या कार्यक्रमाला जि.प उपाध्यक्ष अजय चौधरी,माजी आमदार मधुसूदन केंद्रे,माजी महापौर प्रताप देशमुख, डॉ मुंजाभाऊ धोंडगे, डॉ परमेश्वर जाधव,डॉ शितल जाधव, महापालिका आयुक्त देविदास पवार इत्यादी उपस्थित होते.
ConversionConversion EmoticonEmoticon