माजी पोलीस आयुक्त परंबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केल्याचा आदेश केला रद्द

न्यायालयाने परंबीर सिंग यांना फरार घोषित करण्याचा पोलिसांना दिलेला आदेश गुरुवारी रद्द करण्यात आला
मुंबई :मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परंबीर सिंग यांच्यावर खंडणी वसुली प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. तेव्हा पासून परंबीर सिंह बेपत्ता होते.त्यामुळे न्यायालयाने परंबीर सिंग यांना फरार घोषित करण्याचा पोलिसांना आदेश दिला होता. परंबीर सिंग सोमवारी मुख्य दांडाधिकाऱ्या समोर स्वतः हजर राहून 'फरार' घोषित आदेश रद्द करण्याची न्यायालयाला विनंती केली होती. गुरुवारी न्यायालयाने परंबीर सिंग यांची विनंती मान्य करीत फरार घोषित आदेश रद्द केला आहे.त्यामुळे परंबीर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परंबीर सिंह हे मागील अनेक दिवसापासून बेपत्ता होते.त्यांच्यावर वेगवेगळ्या 3 न्यायालयाने अजामिनपात्र वारंट जारी करण्यात आले होते.त्यामुळे मुंबई पोलिसांनी बेपत्ता असलेल्या परंबीर सिंह यांना फरार घोषित करण्यासाठी दांडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता.
या प्रकरणी हॉटेल चालक बिमल अग्रवाल यांनी खंडणी वसुली प्रकरणी परंबीर सिंह तसेच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझसे व अन्य काही जनाविरुद्द तक्रार दाखल झाली होती.त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले होते.त्यानंतर परंबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर पोलीस पुढील प्रक्रिया करत असताना 22 नोव्हेंबर रोजी परंबीर सिंह मुंबई मध्ये परत आले. आणि त्यांनी फरार घोषित आदेश रद्द करण्याची न्यायालयाला विनंती अर्ज केला होता. दरम्यान विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी परंबिर सिंह यांच्या फरार घोषित आदेश रद्द करण्याच्या अर्जावर आक्षेप घेतला होता.

परंबीर सिंह यांनी इतक्या दिवस तपास प्रक्रियेपासून स्वतःला दूर का ठेवले होते आणि ते आता पर्यन्त कुठे होते याबाबतीत कुठलीच माहिती अर्जात नमूद करण्यात आली नाही तसेच परंबीर सिंह ज्या पदावर असताना सरकारी वाहनाचा जो गैरवापर केला या बाबी न्यायालयाने लक्षात घ्याव्यात अशी बाजू विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मांडली होती. परंतु न्यायालयाने परंबीर सिंह यांचा फरार घोषित आदेश रद्द केला आहे.
Previous
Next Post »