एसटी महामंडळाने गुरुवारी 498कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून निलंबणाची कार्यवाही या पुढेही सुरूच राहणार
एसटी महामंडळाने आता कठोर पावलं उचलली असून संपावर असलेल्या 498 एसटी कर्मचाऱ्यांचे गुरुवारी निलंबन करण्यात आले आहे.आतापर्यंत 9 हजार कर्मचारी निलंबित केले आहेत.एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनकरणाच्या मागणी साठी 29 ऑक्टोबर पासून संप पुकारला असून आज पर्यन्त सुरूच आहे.
महामंडळाने 41 टक्के पगार वाढ करून देखील कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे.त्यामुळे आता महामंडळाने कठोर भूमिका घेतली असून संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबणाची कार्यवाही करण्यात येत आहे. आता पर्यन्त कायमस्वरूपी असणाऱ्या 9 हजार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे तर रोजंदारीवर असणाऱ्या 36 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.आतापर्यंत 1 हजार 928 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.निलंबणाची कार्यवाही यापुढेही अशीच सुरु राहणार असल्याचे सांगितले जाते.
92 हजार 226 कर्मचाऱ्यांपैकी गुरुवारी 18 हजार 882 कर्मचारी कामावर हजर असल्याची नोंद झाली असून उर्वरित कर्मचारी अद्यापही संपात सहभागी असल्यामुळे गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1 हजर 348 गाड्याच रस्त्यावर धावू शकल्या. यामध्ये 1 हजार 105 सध्या गाड्या आहेत तर बाकीच्या शिवशाही व शिवनेरी गाड्या आहेत.
दरम्यान,एसटी महामंडळाच्या विलीनकारणाच्याबाबतीत अभ्यास करण्यास स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल आल्याशिवाय राज्य सरकार काहीही करूशकणार नाही अशी स्पष्ट माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon