योगी सरकारचा अजब दावा ;दिल्लीतील प्रदूषणास पाकिस्तान जबाबदार

दिल्लीतील प्रदूषणास उत्तर प्रदेशचं काही देणं घेणं नसून याला पाकिस्तान जबाबदार असा अजब दावा योगी सरकारच्यावतीने केला,'सुप्रीम कोर्ट म्हणते आता आम्ही' दिल्लीतील उद्योग बंद करावेत का?
दिल्ली :दिल्लीतील दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणासंबंधी योगी आदित्यनाथ सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात अजब दावा केला आहे. दिल्लीतील वाढणारे प्रदूषण आणि उत्तर प्रदेश मधील उद्योगाचा यात काहीही संबंध नसून याला पाकिस्तान जबाबदार आहे.पाकिस्तानातील प्रदूषित हवेचा दिल्लीवर परिणाम होत असल्याचे उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात सांगितले आहे.दिल्ली -एनसीआरमधील हवा प्रदूषणावरील याचिकेवर न्या. एन व्ही. रमण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान आता आम्ही दिल्लीमधील उद्योग बंद करावेत का असा प्रश्नही न्या. एन व्ही रमण यांनी यावेळी विचारला.

सुनावणी दरम्यान उत्तर प्रदेश सरकारच्यावतीने जेष्ठ वकील रणजित कुमार यांनी याप्रकरणी युक्तिवाद केला. युक्तिवाद करताना दिल्लीतील प्रदूषणाशी उत्तर प्रदेशाचा काहीही संबंध नसून उत्तर प्रदेश मधील प्रदूषित हवा दिल्लीच्या दिशेने जात नसल्याचे सांगितले आहे.तसेच पाकिस्तानच्या बाजूने येणारी प्रदूषित हवा दिल्लीतील हवेवर परिणाम करत प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे असा दावा रणजित कुमार यांनी केला आहे.
Previous
Next Post »