परळीमध्ये रुग्णालयातील टेकनिशियनने गळफास घेऊन केली आत्महत्या

परळीमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील एका तंत्रज्ञाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
परळी वै : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयातील एका क्ष - किरण तंत्रज्ञाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी घडली आली.या घटनेने कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत मयत कर्मचाऱ्याचे सिद्धार्थ पंडित जाधव असं नाव असल्याचे समजले आहे.
सिद्धार्थ जाधव हे परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात क्ष -किरण तंत्रज्ञ म्हणून नौकरी करत होते. दोन महिन्यापूर्वीच ते इथे रुजू झाले होते. आज सकाळी ते दवाखान्यात आले नाही त्यामुळे त्यांना दावाखाण्यातून मोबाईल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सिद्धार्थ जाधव यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचारी ते राहत असलेल्या सरकारी क्वार्टर मध्ये जाऊन दरवाजा वाजवला असता आतून आवाज येत नव्हता तेव्हा  दवाखान्यातील  इतर कर्मचाऱ्यांना सांगितल्या नंतर दवाखाना प्रशासनाने पोलिसांना माहिती कळविली. पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडला असता सिद्धार्थ जाधव हे गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.आत्महत्या करण्यामागचे कारण काय हे अद्याप कळू शकले नाही.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng