अनिल देशमुखांना चांदीवाल आयोगाने ठोठावला 50 हजाराचा दंड


चांदीवाल आयोगाने अनिल देशमुख यांना ठोठावला 50 हजाराचा दंड 

मुंबई :
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चांदीवाल आयोगाने 50 हजाराचा दंड ठोठावला आहे.अनिल देशमुख यांच्या वकिलाकडून सचीन वाझेची उलट तपासणी सुरु आहे मात्र देशमुख यांचे वकील आज चांदीवाल आयोगासमोर हजार झाले नसल्याने आयोगाने अनिल देशमुख यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.तसेच दांडाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधित जमाकरण्याचे सांगितले आहे.
चांदीवाल आयोगाने अनिल देशमुख यांना ठोठावला 50 हजाराचा दंड चांदीवाल आयोगाने अनिल देशमुख यांना ठोठावला 50 हजाराचा दंड
मुंबई पोलिसांनी बडतर्फ केलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे याला एन आय ए ने अटक केली होती त्यानंतर वाझेला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. सचिन वाझेची उलट तपासणी करण्यासाठी अनिल देशमुख यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने सचिन वाझेची उलट तपासणी करण्याची परवानगी देशमुख यांच्या वकिलाला देण्यात आली होती त्याच सोबत चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुख यांना हजार राहण्याची सुद्धा परवानगी देण्यात आली होती.त्याच अनुसंगाने सचिन वाझे याची अनिल देशमुख यांच्या वकिलांनी या पूर्वी दोन वेळा उलट तपासणी केली होती.
14 डिसेंबरला सचिन वाझे याची उलट तपासणी केली तेव्हा सचिन वझेला विचारण्यात आले होते कि अनिल देशमुख यांनी पैसे वसुल करण्यास सांगितले होते का? यावर सचिन वाझे यानी नाही असं उत्तर दिलं होतं.त्यामुळे या प्रकरणाला नविन वळण आलं आहे.त्याच पार्षवभूमीवर आज पुन्हा अनिल देशमुख यांच्या वकिलाकडून सचिन वाझेची उलट तपासणी होणार होती. परंतु अनिल देशमुख यांचे वकील चांदीवाल आयोगासमोर हजार झाले नसल्याचे आज होणारी सुनावणी 22 डिसेंबर ला दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. त्याच सोबत आयोगाने अनिल देशमुख यांना 50 हजार रुपयांचा दंड सुनावला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधित जमा करण्याचा आदेश देण्यात आला.
Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng