कर्नाटकातील शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचे लोकसभेत उमटले तीव्र पडसाद

         (छत्रपती शिवरायांच्या पुतळा विटंबना प्रकरणी                     लोकसभेत तीव्र पडसाद उमटले  )

बंगरुळू येथील शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचे उमटले लोकसभेत तीव्र पडसाद
नवी दिल्ली : कर्नाटक - बंगरुळू येथे मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञात समाज कंठकांकडून विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी लोकसभेत उमटल्याचे पहायला मिळाले.शिवसेना खासदारांनी कर्नाटक सरकार विरोधी फलक लावून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
लोकसभेत शिवसेना गटनेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वात राजन विचारे, अरविंद सावंत,कृपाल तुपाने आणि प्रताप जाधव यांच्यासह निषेधाचे फलक हातात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचा जाहीर निषेध करत कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करत निषेध व्यक्त केला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंठकांना तात्काळ करून अटक करून कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी संतापलेल्या शिवसेना खासदारांनी मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.

Previous
Next Post »

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng