शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची कृषी मंत्रालयाकडे कोणतीच नोंद नसल्याने नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच नाही -कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर

शेतकरी आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची कोणतीच नोंद केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे नाही, त्यामुळे नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच नाही असे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट सांगितले आहे
दिल्ली:संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी 29 नोव्हेंबर पासून सुरु झाले असून आजचा तिसरा दिवस आहे.परंतु आजही अधिवेशनाची सुरुवात विरोधी पक्षाच्या खासदारांच्या गोंधळानेच झाली.विरोधी पक्षाच्या 12 खासदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे यासाठी विरोधी खासदारांनी गोंधळ घातला. या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 पर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर लगेचच काही वेळात लोकसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब कारण्यात आले.

राज्यसभेच्या 12 विरोधी खासदारांचे निलंबन करण्याच्या कारणावरून विरोधी खासदारात नाराजी झाली आहे. या 12 खासदारांचे निलंबन रद्द करण्यात यावे या मागणीसाठी संसदेतील गांधी पुतळ्या जवळ आंदोलन सुरु केले आहे. मात्र राज्यसभेचे सभापती यांनी निलंबित खासदारांना माफी मागण्यास सांगितले आहे. परंतु निलंबित खासदार माफी मागण्यास तयार नाहीत. निलंबित 12 खासदारांपैकी 2 खासदार हे तृणमूल काँग्रेसचे असून त्यांनी गांधी पुतळ्या समोर बसून धरणे आंदोलन सुरु केले आहे.

दरम्यान एका विरोधी खासदाराने प्रश्न विचारला होता की शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची माहिती किंवा नुकसानभरपाई संबंधी काही डाटा आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणले की कृषिमंत्रालयाकडे याची कोणतीही नोंद झालेली नाही त्यामुळे नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही असे स्पष्ट सांगितले.
आज अधिवेशन सुरु होण्याआगोदरच 12 खासदारांचे निलंबन रद्द करण्यासाठी आंदोलनाला सुरवात झाली. राज्यसभेतील विरोधी नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की हे धरणे आंदोलन चालूच राहील आणि आंदोलनाची पुढील कृती ठरवू असे सांगितले आहे.
Previous
Next Post »