भाजपा विरोधी आघाडीत समविचारी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे -शरद पवार

देशात भाजपा विरोधी नव्याने निर्माण होणाऱ्या आघाडी मध्ये कॉग्रेस असेल की नसेल यावर राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत
आज पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी राष्ट्रवादीकाँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. भेटी दरम्यान भाजपा विरोधी सक्षम पर्याय देण्यासाठी नवी आघाडी निर्माण करण्यासंबंधी सकारात्मक चर्चा करण्यात आली. देशात होणाऱ्या 2024 च्या निवडणुकीच्या अनुसंगाने भाजपा विरोधी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. अशा प्रकारची भूमीका राष्ट्रवादीकाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्ष आघाडीत असेल की नसेल?
काँग्रेस पक्ष या आघाडीचा भाग असेल की नसेल. नवी आघाडी निर्माण झाल्यास सध्या अस्तित्वात असलेल्या युपीएचं काय होणार याबाबत राजकीय चर्चा होत आहेत.काँग्रेस पक्ष आघाडीचा भाग असेल की नसेल हा मुद्दाच येत नाही. जे पक्ष भाजप विरोधी आहेत त्यांनी या आघाडीत सामील व्हावे. भाजपाला देशातून घालविण्यासाठी भाजपा विरोधी सर्वच पक्षांनी एकत्र आले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.भविष्यातील रण नीती बाबतीत ममता बॅनर्जी यांनी व शरद पवार यांच्यात सखारात्मक चर्चा झाली आहे. भाजपा विरोधी पक्षांची मोठ बांधण्यासाठी ममता बॅनर्जी शरद पवारांशी चर्चा करण्यासाठी आल्या होत्या.

आघाडीचे नेतृत्व कोण करणार?
भाजपा विरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार याबाबतीत राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत. या आघाडीत कोण कोणते पक्ष सामील होणार आणि आघाडीचे नेतृत्व कोण करणार याबाबतीत चर्चा रंगू लागल्यात. परंतु शरद पवारांनी याबाबतीत स्पष्ट सांगितले की आघाडीचे नेतृत्व कोण करणार हा मुद्दाच नाही. सक्षम आघाडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.आघाडीच्या नेतृत्वाचा प्रश्न दुयम बाब असल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले आहे.
आज ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन भाजपा विरोधी आघाडी निर्माण करण्याचे संकेत  दिले आहेत हे मात्र नक्की आहे.

Previous
Next Post »