एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या पगारात नव्याने 5 हजार रुपायांची वाढ केली असून 10 वर्षापर्यंतची सेवा असणाऱ्यांना ही पगार वाढ मिळणार आहे
मुंबई :एसटी महामंडळाने पगार वाढीचा मोठा निर्णय घेतला असून नवनियुक्त कर्मचाऱ्यापासून ते 10 वर्षापर्यंतची सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपये पगार वाढ केली आहे. मात्र ही पगार वाढ संपकाळात कामावर हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना वेतन महिन्याच्या 7 तारखेला होणार आहे.एसटी महामंडळाने पगार वाढीचे नविन परिपत्रक जारी केले असून पगार वाढीच्या व्यतिरिक्त 28 टक्के महागाई भत्ता देखील देण्यात येत असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाने नव्याने काढलेल्या सुधारित परिपत्रकात 5 हजार रुपये पगार वाढ करण्यात आली असून याचा लाभ नवनियुक्त कर्मचारी पासून ज्या कर्मचाऱ्यांची 10 वर्षापर्यंत सेवा असणाऱ्यांना मिळणार आहे.10 ते 20 वर्षापर्यंतच्या सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 4 हजार रुपये पगार वाढ मिळणार आहे, तर 20 वर्षा पेक्षा जास्त सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रुपये पगार वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच 28 महागाई भत्ता देखील देण्यात येणार. मात्र पगार वाढीचा लाभ कामावर रुजू असणाऱ्या कामाचाऱ्यांनाच मिळणार आहे.
एसटी कर्मचारी मात्र विलीनिकरणाच्या मुद्यावर ठाम असून संप चालूच आहे. महामंडळातील 92 हजार 266 कर्मचाऱ्यांपैकी बुधवारी फक्त 18 हजार 694 कर्मचारी कामावर हजर होते.कामावर रुजू होण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने पगार वाढीची माहिती देण्यासाठी परिपत्रक काढले आहे. दरम्यान कर्मचाऱ्यावरील निलंबणाची कार्यवाही सुरूच असून बुधवारी 448 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.आतापर्यंत 8 हजार 643 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे तर आतापर्यंत 1 हजार 892 कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच रोजंदारीवरील 65 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon