कोरोनाचा नवा विषाणू 'ओमायक्रोन 'च्या फैलावामुळे राज्यात कडक निर्बंध, लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवासाची मुभा
ओमायक्रोन च्या पार्शवभूमीवर राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून मुंबई, उल्हासनगर, नाशिक या शहरात टॅक्सी किंवा रिक्षा मधून प्रवास करण्यासाठी लसीचे दोन डोस अनिवार्य केले आहेत. चालक आणि प्रवासी दोघांनाही लसीचे दोन डोस अनिवार्य केले आहेत. विना लस घेता प्रवास करता येणार नाही. विना डोस प्रवास केल्यास दांडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. मुंबई मध्ये बेस्ट बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधन कारक आहे. विना डोस प्रवास केल्यास दंड थोटावण्यात येणार आहे.
पुण्यात चित्रपटगृह व नाट्यगृह यांना 25 टक्के क्षमतेची परवानगी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून विना मास्क फिरणाऱ्यावर कार्यवाही केली जाणार आहे.टॅक्सी व रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लसीचे दोन डोस ची सक्ती केली आहे सोबतच टॅक्सी व रिक्षा चालकांना सुद्धा लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक केले आहे. नियमांचे पालन न केल्यास दांडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
1 डिसेंबर पासून इयत्ता पहिली पासूनच्या सुरु होणाऱ्या शाळा आता 10 ते 15 डिसेंबर पासून सुरु केल्याजातील. नाशिक मध्ये 10 डिसेंबर पासून इयत्ता पहिली पासूनच्या शाळा सुरु करण्यात येणार असल्याचे नाशिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे. राज्यातील ग्रामीण भागातील शाळा आज 1 डिसेंबर पासून सुरु होत असून कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना मास्क व शिक्षकांना घालणे अनिवार्य आहे. सोसिअल डिस्टन्सचे पालन करणे आणि वेळोवेळी हात धुणे बंधनकारक आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon