मुंबई :नायर हॉस्पिटल :मुंबईमधील वरळी येथील बीडीडी चाळीत एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दम्पत्याला उपचारासाठी नायर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु जखमीवर उपचार करण्यास रुग्णालयातील डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे या दुर्घटनेत भाजलेल्या 4 महिन्याच्या बळाचा मृत्यू झाला.या प्रकरणात रुग्णालयातील 2 डॉक्टर व एका नर्स वर निलंबणाची कार्यवाही करण्यात आली आहे.या प्रकरणी उपाधीष्टांमार्फत चौकशी सुरु असून चौकशीचा अहवाल पुढील आठवड्यात येणार आहे. तसेच अहवाला नंतर त्रयस्थ समितीद्वारे देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.या प्रकरणी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीत असणाऱ्या भाजपाच्या 11 सदस्यांनी आज गुरुवारी राजीनामे दिले आहेत.
वरळीतील बीडीडी चाळी मध्ये एका घरात सिलेंडर चा स्फोट झाल्यामुळे घरातील 4 जन जखमी झाले होते. त्या 4 जखमींना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु जखमीवर उपचार करण्यास दिरंगाई झाल्याचा व्हिडिओ वायरल झाल्याने नायर रुग्णालय व पालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त होत होता.याप्रकारणी भाजपाच्या शिष्टमंडळाने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची भेट घेऊन या प्रकरणातील दोषींवर कडक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाच्या पालकांना नुकसान भरपाई म्हणून 25 लाख रुपये देण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या जखमीवर एक तास उशिराने उपचार करण्यास सुरुवात केल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता.त्यामुळे पालिकेने ताबडतोब चौकशी सुरु केली होती.प्राथमिक चौकशी नंतर 2 डॉक्टर आणि एका परिचारिकेला आज गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे.दरम्यान भाजपाच्या 11 सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. भाजपाच्या शिष्टमंडळाने दोषी डॉक्टरांवर अग्रीपाडा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून पालिकेतील सार्वजनिक आरोग्य समितीमधील भाजपाच्या 11 सदस्यांनी आपले राजीनामे महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon