राज्यात कोरोनापाठोपाठ पुन्हा पावसाचे सावट
मुंबई : राज्यात पुन्हा पावसाचे संकट,28 आणि 29 डिसेंबर रोजी मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटा सह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.पश्चिमी प्रकोप पुर्व अफगाणिस्तान व पाकिस्तानवर असून ते राजस्थानच्या हवेतील सिस्टीम मधून विदर्भापर्यंत कार्यरत राहणार असेल आणि त्याचा प्रभाव 28 ते 29 डिसेंबर रोजी पुर्व मध्य प्रदेश,छत्तीसगड आणि विदर्भात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून 28 डिसेंबर रोजी पश्चिम मध्यप्रदेश आणि मराठवाड्यामध्ये ही अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान शाश्त्र विभागाने वर्तवला आहे.तापमाणात काहीसा बदल दिसून येत असून विदर्भात काही ठिकाणी तापमाणात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिलते तर कोकण आणि गोवामध्ये काही भागात सरासरी तापमानाच्या तुलनेत काही शी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव मध्ये 11.7 अंश सेल्शिअस नोंद झाली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon